एएमएतर्फे नंदकिशोर कागलीवाल, राम भोगले यांचा गौरव
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (एएमए) तर्फे 'रेअर' अभिनंदन या विशेष उपक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज व्यक्तिमत्त्वे नंदकिशोर कागलीवाल आणि राम भोगले यांचा सन्मान करण्यात आला. उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना नुकतेच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात
AMA
Rare
आला होता.
यावेळी नंदकिशोर कागलीवाल यांनी भविष्यातील आर्थिक विकासाच्या दृष्टीने दूरदृष्टीने नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. आगामी
काळात अपेक्षित असलेल्या मोठ्या आर्थिक वाढीला सामोरे जाण्यासाठी तसेच त्याचा लाभघेण्यासाठी सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राम भोगले यांनी
व्यवसायातील यशासाठी काम आणि वैयक्तिक जीवनातील समतोल हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन उद्योजक डॉ. उल्हास गवळी यांनी केले. त्यांच्या हलक्याफुलक्या शैलीमुळे गंभीर विषयावरील ही बौद्धिक चर्चा अधिक रंजक झाली आणि उपस्थितांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने एमएमएतर्फे नंदकिशोर कागलीवाल आणि राम भोगले यांना विशेष स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या
प्रारंभी एमएमएचे अध्यक्ष सतीश कागलीवाल यांनी मनोगतातून कार्यक्रमाला देखणी व औपचारिक सुरुवात करून दिली. एमएमएचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला.
तसेच आगामी सचिव वेद जहागीरदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. चारू देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साथ दिली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी संजय संघवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















